Showing posts with label महाराष्ट्र राज्य (थोडक्यात माहिती) Maharashtra State in short. Show all posts
Showing posts with label महाराष्ट्र राज्य (थोडक्यात माहिती) Maharashtra State in short. Show all posts

Thursday, April 29, 2021

महाराष्ट्र राज्य (थोडक्यात माहिती)

👉"महाराष्ट्र दिन प्रश्न मंजूषा" साठी येथे क्लिक करा CLICK HERE FOR "QUIZ ON MAHARASHTRA DAY" "महाराष्ट्र दिन प्रश्न मंजूषा" के लिए यहाँ क्लिक करें👈

महाराष्ट्र राज्याची स्थापना 1 मे 1960 रोजी झाली. 

स्थापनेच्या वेळी महाराष्ट्रात 26 जिल्हे, 235 तालुके, 4 प्रशासकीय विभाग होते.

सध्यास्थितीत महाराष्ट्रात 36 जिल्हे, 355 तालुके, 535 शहरे, 43663 खेडी, 6 प्रशासकीय विभाग आहेत.



👉महाराष्ट्रातील 6 प्रशासकीय विभाग:

  • कोकण (30746 चौ.किमी): मुंबई, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी/सिंधुदुर्ग.
  • पुणे/प.महाराष्ट्र (57268 चौ.किमी): पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर.
  • नाशिक/खान्देश (574426 चौ.किमी): नाशिक, अहमदनगर, धुळे, जळगाव, नंदुरबार.
  • औरंगाबाद/मराठवाडा (64822 चौ.किमी): औरंगाबाद, जालना, बीड, परभणी, हिंगोली, उस्मानाबाद, लातूर, नांदेड.
  • अमरावती/प.विदर्भ (46090 चौ.किमी): अमरावती, बुलढाणा, अकोला, यवतमाळ, वाशिम.
  • नागपूर/पूर्व.विदर्भ (51336 चौ.किमी): नागपूर, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया.

👉नैसर्गिक सीमा :

  • वायव्येस : सातमाळा डोंगररांगा, गाळणा टेकड्या व सातपुडा पर्वतातील अक्राणी टेकड्या.
  • उत्तरेस : सातपुडा पर्वतरांगा व त्याचा पूर्वेस गाविलगड टेकड्या.
  • ईशान्येस : दरेकासा टेकड्या.
  • पूर्वेस : चिरोळी टेकड्या व भामरागड डोंगर.
  • दक्षिणेस : हिरण्यकेशी नदी व कोकणातील तेरेखोल नदी.
  • पश्चिमेस : अरबी समुद्र.

👉राजकीय सीमा व सरहद्द :

  • वायव्येस : गुजरात व दादरा नगर हवेली.
  • उत्तरेस : मध्यप्रदेश.
  • पूर्वेस : छत्तीसगड.
  • आग्नेयेस : आंध्र प्रदेश.
  • दक्षिणेस : कर्नाटक व गोवा.

👉राज्य व त्यांना जोडणारे महाराष्ट्रातील जिल्हे :

  • गुजरात : पालघर, नाशिक, नंदुरबार, धुळे
  • दादर नगर हवेली : ठाणे, नाशिक
  • मध्ये प्रदेश : नंदुरबार, धुले, जळगाव, बुलढाणा, अमरावती, नागपुर, भंडारा, गोंदिया
  • छत्तीसगड : गोंदिया, गडचिरोली
  • आंध्रप्रदेश : गडचिरोली, चंद्रपुर, यवतमाळ, नांदेड
  • गोवा : सिंधुदुर्ग

👉महाराष्ट्राचे भारतातील स्थान :

– भारतातील 29 राज्यांपैकी एक.
– भारताच्या मध्यवर्ती भागात .
– महाराष्ट्र राज्य ही उत्तर भारत व दक्षिण भारतात एकत्र आणणारी विशाल भूमी आहे .

1. विस्तार

  • अक्षांश  : 15° 41’ उत्तर अक्षवृत्त ते 22° 6’ उत्तर अक्षवृत्त.
  • रेखांश : 72° 36’ पूर्व रेखांश ते 80° 54’ पूर्व रेखावृत्त.

2. आकार

  • व्हीव्हीत्रिकोणाकृती, दक्षिणेस चिंचोळा तर उत्तरेस रुंद.
  • पाया – कोकणात व निमुळते टोक विदर्भात.

3. लांबी, रुंदी व क्षेत्रफळ

  • लांबी = पूर्व – पश्चिम – 800 किमी.
  • रुंदी = दक्षिण – उत्तर – 720 किमी.
  • क्षेत्रफळ = 307713 चौ.किमी.
  • क्षेत्रफळाच्या द्रुष्टीने भारतात राजस्थान, मध्यप्रदेश नंतर महाराष्ट्रचा 3 रा क्रमांक लागतो.
  • महाराष्ट्राने देशाचा 9.36% भाग व्यापला आहे.
  • समुद्रकिनारा 720 किमी. लांबीचा आहे.

👉जिल्हे निर्मिती :

  • 1 मे 1981 : रत्नागिरीपासून – सिंधुदुर्ग (27 वा जिल्हा)
    औरंगाबादपासून – जालना (28 वा जिल्हा)
  • 16 ऑगस्ट 1982 : उस्मानाबादपासून – लातूर (29 वा जिल्हा),
  • 26 ऑगस्ट 1982 : चंद्रपूरपासून – गडचिरोली (30 वा जिल्हा)
  • 1990 : मुंबईपासून – मुंबई उपनगर (31 वा जिल्हा)
  • 1 जुलै 1998 : धुळेपासून – नंदुरबार (32 वा जिल्हा)
    अकोल्यापासून – वाशिम (33 वा जिल्हा)
  • 1 मे 1999 : परभणीपासून – हिंगोली (34 वा जिल्हा)
    भंडारा  – गोंदिया (35 वा जिल्हा)
  • 1 ऑगस्ट 2014 : ठाण्यापासून – पालघर (36 वा जिल्हा)
  • महाराष्ट्राची प्राकृतिक रचना :

    👉महाराष्ट्राच्या प्राकृतिक रचनेचे तीन विभाग

    1. कोकण किनारपट्टी :

    • स्थान: महराष्ट्र अरबी समुद्र व सह्याद्रि पर्वत यांच्या दरम्यान दक्षिणोत्तर लांब पट्टयास ‘कोकण’ म्हणतात.
    • विस्तार: उत्तरेस – दमानगंगा  नदीपासून दक्षिणेस – तेरेखोल खाडीपर्यंत. कोकण किनारपट्टी ‘रिया’ प्रकारची आहे.
    • लांबी:  दक्षिणोत्तर = 720 किमी,  रुंदी = सरासरी 30 ते 60 किमी. उत्तर भागात ही रुंदी 90 ते 95 किमी. तर दक्षिण भागात ही रुंदी 40 ते 45 किमी.  
    • क्षेत्रफळ: 30,394 चौ.किमी.

    2. सह्याद्रि पर्वत / पश्चिम घाट :

    • स्थान: दख्खनच्या पठाराचा पश्चिमेकडील न खचलेला भाग म्हणजेच सह्याद्रि होय.
    • यामुळे सह्याद्रि पश्चिमेकडून अत्यंत उंच व सरल भिंतीसारखा दिसतो.
    • पठाराकडून मात्र अत्यंत मंद उताराचा दिसतो.सह्याद्रि पर्वत हा प्राचीन असून या पर्वताची बर्‍याच ठिकाणी झीज झाल्याने कमी – अधिक उंचीची ठिकाणे तयार झाली आहेत. उदा. शिखरे, घाट, डोंगर, उंचीवरील सपाट प्रदेश इ.

    3. महाराष्ट्र पठार / दख्खन पठार / देश :

    • स्थान: महाराष्ट्र राज्यांपैकी एकूण क्षेत्रफळापैकी 90% क्षेत्र महाराष्ट्र पठाराणे व्यापले आहे.
    • लांबी-रुंदी:  पूर्व- पश्चिम – 750km. उत्तर- दक्षिण – 700km.

    • ऊंची:  450 मीटर– या पठाराची ऊंची पश्चिमेस (600 मी) जास्त व पूर्वेस (300 मी) कमी आहे.
    • महाराष्ट्र पठार डोंगर रांगा व नद्या खोर्‍यांनी व्यापले आहे.
  • You may like to read this also:
  • 👉Maharashtra: Arts & Culture

👉"महाराष्ट्र दिन प्रश्न मंजूषा" साठी येथे क्लिक करा CLICK HERE FOR "QUIZ ON MAHARASHTRA DAY" "महाराष्ट्र दिन प्रश्न मंजूषा" के लिए यहाँ क्लिक करें👈
महाराष्‍ट्र के राजकीय प्रतीक (State Symbols of Maharashtra)
राजकीय पुष्प जरुल (Jarul)
राजकीय पक्षी हरा कबूतर (Green Pigeon)
राजकीय पशु भारतीय विशाल गिलहरी (Indian Giant Squirrel)
राजकीय वृक्ष आम (Mango)
राजकीय खेल कबड्डी (Kabaddi)
राजकीय लोक नृत्य तमाशा (Tamasha), लावनी (Lavani)
राजकीय गीत जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

MCQ Quiz: Citizen's Charter of Navodaya Vidyalaya Samiti MCQ Quiz: Citizen's Charter of N...

PROMISEDPAGE

Quiz on "AZAD HIND FAUJ" UPLOADED. TYR IT.

BEST OF LUCK

"HAVE A NICE DAY "