Showing posts with label #World Metrology Day. Show all posts
Showing posts with label #World Metrology Day. Show all posts

Saturday, March 19, 2022

जागतिक हवामानशास्त्र दिन

 निसर्गचक्रात वर्षानुवर्ष बिनचूकपणे होणा-या घटनांपैकी एक म्हणजे १ जूनला भारतात दाखल होणारा मान्सूनचा  पाऊस परंतु गेल्या काही वर्षात जगभराच नैसर्गिक नियमितता नाहीशी होऊन अनपेक्षित बदलांचे प्रमाण वाढत आहे. हवामानातील हे बदल आणि त्यांचे परिणाम ग्लोबल असले तरी त्यावरच्या उपाययोजना लोकल (स्थानिक) स्वरूपातही करता येतात.

हवेचे तापमान, वातावरणातील दाब, वाऱ्याची गती व दिशा यांच्या परस्परसंबंधातून निर्माण होणारी वादळे, ढग, पाऊस, विजांचा कडकडाट आदी घटनांची कालमानानुसार बदलणाऱ्या वागणुकीचा अभ्यास करणाऱ्या शास्त्रास हवामानशास्त्र (इंग्लिश: Meteorology, मीटिअरॉलजी ;) असे म्हणतात. वातावरणातील या घडामोडीचे निरिक्षण करुन त्यांचा अभ्यास करणे, त्यानुसार जवळच्या आणि दूरच्या भविष्यातील हवामानाविषयी अंदाज बांधणे हे हवामानशास्त्रज्ञांचे प्रमुख काम असते. २३ मार्च हा दिवस ‘जागतिक हवामानशास्त्र दिन' म्हणून साजरा होतो.

इतिहास

इसवी सन पूर्व सातव्या शतकात बॅबिलॉनमध्ये ढगांच्या रचनेवरून हवामानाचा अंदाज वर्तवला जात असे दिसून येते. ग्रीस, चीन व भारतात विविध नैसर्गिक निरीक्षणांचा व खगोलशास्त्राचा वापर हवामानाचा अंदाज वर्तविण्यासाठी केला जात असे. भारतीय ज्योतिष शास्त्रातील निरिक्षणांनुसार हस्त, मृग नक्षत्राच्या राशीतील स्थानानुसार पाऊस कधी पडणार, याचा अंदाज घेतला जात असे. परंतु हे ठोकताळे दर वेळी अचूक असतील असे घडत नसे. शिवाय ज्योतिषाच्या अभ्यासानुसार त्यात फरकही होण्याची शक्यता असे.

इ.स. १९२२ मध्ये लुइस फ्राय रिचर्डसन या हवामान शास्त्रज्ञाने अंदाज वर्तविण्याची सांख्यिक पद्धती सुचवली. या पध्हतीनुसार निरिक्षणांच्या सांख्यिक विश्लेषणानुसार सारखेपणा शोधून त्यानुसार काही प्रमाणात हवामान अंदाज वर्तविता येऊ लागले. मात्र ही आकडेवारी मोठी असत असे.

मूळ संकल्पना व सुरुवात

१९५० साली जागतिक हवामानशास्त्र संघटना (WM WMO)  स्थापन झाली. ही संस्था स्थापन होण्यासाठी पुढाकार घेण्या-या ३१ देशांत भारत ही होता. यानंतर जगातल्या सर्व देशांमध्ये केल्या जाणा-या हवामानाच्या नोंदीच्या देवाणघेवाणीला सर्वोच्च प्राधान्य देण्यात आले. कारण स्थानिक हवामानाचा संबंध जागतिक पातळीवरील नैसर्गिक बदलांशी असतो हे आपल्या ध्यानात आले.

वर्तमान स्थिती

संगणकाच्या शोधाने हवामानशास्त्राचा अभ्यास सुकर झाला. हवामान निरीक्षणांचा उपयोग करून, अंदाज वर्तविण्याची सांख्यिक पद्धतीने गणिते करून, त्यानुसार अंदाज वर्तविण्याचे काम संगणक करू लागले. या नुसार नकाशे तयार करण्याचे कामही संगणक करू लागले.

साधने

वार्‍याचा वेग मोजण्याचे साधन - अ‍ॅनोमिटर

हवामान निरीक्षणासाठी अनेक प्रकारची साधने वापरली जातात. या साधनांच्या मदतीने हवामानविषयक घटनेचे भौगोलिक स्थान, तिची तीव्रता, वेग, प्रकार, तिच्यामुळे होणारे तापमानातील बदल अशा निरीक्षणांची नोंद केली जाते. ही उपकरणे जमीन, समुद्र आणि वातावरण अशी तिन्ही ठिकाणी निरिक्षणासाठी नियुक्त केली जातत.

जमिनीवरील साधने - ही प्रामुख्याने हवामान वेधशाळांमध्ये असतात.

रडार - ठिकठिकाणी उभारलेले रडार रेडिओलहरींच्या साहाय्याने विविध प्रकारच्या वृष्टीचा- पाऊस, गारा, बर्फवृष्टी इत्यादींचा अभ्यास करतात. यातील पल्स डॉपलर प्रकारच्या रडारमुळे वाऱ्याचा वेग व दिशा यांची नोंद करता येते.

समुद्राच्या पाण्यावरील साधने - समुद्राच्या पाण्यावर हेलकावे खाणाऱ्या फुग्यांसारख्या तरंगणाऱ्या वस्तूंना बांधलेली उपकरणे पाणी व वारा या दोन्हींच्या वर्तणुकीची नोंद करतात.

वातावरणात सोडली जाणारी साधने - फुग्यांच्या साहाय्याने पृथ्वीच्या वातावरणात सोडले जाणारे रेडिओ संच तेथील विविध घटकांची निरीक्षणे रेडिओ-लहरींद्वारे पृथ्वीवर पाठवतात. अवकाशात पृथ्वीप्रदक्षिणा करणारे काही मानवनिर्मित उपग्रह खास हवामान निरीक्षणासाठी असतात व बदलांवर लक्ष ठेवून ते बदल कळवत राहतात. या शिवाय चक्रीवादळांचा अभ्यास करण्यासाठी त्या हवामानाच्या ठिकाणी सुरक्षित अंतरावरून घिरटय़ा घालत नोंदी करणारी खास विमाने सोडली जातात. ही विमाने म्हणजे एक प्रकारच्या उडत्या हवामान वेधशाळा असतात.

वरील सर्व प्रकारे केलेल्या निरीक्षणांचा उपयोग हवामान साच्या मध्ये (वेदर मॉडेल्स) करून नजीकच्या भविष्यातील हवामानाविषयी अंदाज वर्तविला जातो.

हवामानाबाबत संपूर्ण जगातील लोकांमध्ये जागृती निर्माण व्हावी, लहान मुलांपासून वयोवृद्धांपर्यंत सार्यांनाच हवामानाचे महत्त्व समजावे, हवामान चांगले राहण्यासाठी कोणती दक्षता घेतली पाहिजे, कोणकोणत्या उपाययोजना केल्या गेल्या पाहिजेत, याविषयी जाणीव आणि जागरूकता निर्माण व्हावी, या उद्देशाने २३ मार्च हा दिवस जागतिक हवामानदिन म्हणून साजरा केला जातो.

हवामानातील अनपेक्षित बदलांमुळे मानवी साधनसंपत्तीचे तर नुकसान होतेच; शिवाय अनेकांचा मृत्यूही ओढवतो. इतर प्राणी - पक्षीही यातून सुटत नाही. कारण जगातील एका भागचे हवामान इतर ठिकाणांहून भिन्न असू शकत नाही तर एका घटकातील बदलाचा परिणाम इतर घटकांवर झालेला  आढळतो. हवामानावर लक्ष ठेवणारी  ‘वर्ल्ड वेदर वॉच’ ही प्रणाली आजही सुरु असून ती आंतरराष्ट्रीय सहकार्याचे प्रतीक मानली जाते. हवामानातील बदल. त्यामागील कारणे व उपाय याबाबी सरकारपासून सर्वसामान्यंपर्यंत प्रत्येकाने समजून घेण्याची तातडीची गरज आज निर्माण झाली आहे.

 हवामानशास्त्राबरोबरचं त्यात होणाऱ्या बदलांविषयी लोकांना जागरूक करणे हा त्यामागील हेतू आहे. दरवर्षी त्यासाठी एक थीम सेट केली जाते. या थीमच्या आधारे वर्षभर काम केलं जातं. हवामानाची स्थिती जाणून घेण्यासाठी आणि त्याचा सकारात्मक-नकारात्मक परिणाम जाणून घेण्याच्या उद्देशाने जागतिक हवामान संस्था 1950 मध्ये स्थापन केली गेली. त्याचे मुख्यालय जिनेव्हा, स्वित्झर्लंडमध्ये आहे. जागतिक हवामान संघटनेचे एकूण 191 सदस्य देश व प्रांत आहेत. ही संस्था पूर, दुष्काळ आणि भूकंप यांसारख्या नैसर्गिक आपत्तींचा अंदाज घेण्यासाठी वापरली जाते. जेणेकरून होणाऱ्या नुकसानीपासून बचाव होऊ शकेल.

जागतिक हवामान दिन  थीम -

2020- 'हवामान आणि पाणी'

2021- 'महासागर, जलवायू आणि हवामान'

2022- 'डिजिटल युगातील मेट्रोलॉजी' (Metrology in the Digital Era)

हा दिवस कसा साजरा केला जातो?

जगभरातील191 देश जागतिक हवामान संस्थेचे सदस्य आहेत. या दिवशी जगभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. हवामानाचा नमुना आणि नैसर्गिक आपत्ती बदलणार्‍या गोष्टींविषयी लोकांना जाणीव करून देण्यासाठी प्रयत्न केले जातात. जागतिक हवामान दिनाच्या दिवशी शाळा, महाविद्यालये, कार्यालये अशा अनेक ठिकाणी वादविवाद, कला स्पर्धा आयोजित केल्या जातात.

1) जागतिक हवामानशास्त्र संघटना (WMO) याचे मुख्यालय - जिनेव्हा (स्वित्झर्लंड).

2) जागतिक हवामानशास्त्र संघटना (WMO) याचे स्थापना वर्ष – सन 1873

3) भारतीय हवामानशास्त्र विभाग (IMD) याचे स्थापना वर्ष – सन 1875.


CCS (CCA) Rules - The Schedule

CCS (CCA) Rules - The Schedule THE CENTRAL CIVIL SERVICES (Classification, C...

PROMISEDPAGE

Quiz on "AZAD HIND FAUJ" UPLOADED. TYR IT.

BEST OF LUCK

"HAVE A NICE DAY "