Saturday, January 29, 2022

CISF Fireman Constable Recruitment 2022

 


CISF Fireman Constable Recruitment 2022 : 12 वी पाससाठी बंपर पोस्टिंग, आजपासून अर्ज करा, कसे ते जाणून घ्या

CISF Fireman Constable Recruitment 2022 : केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाने (CISF) त्यांच्या अधिकृत वेबसाईटवर cisfrectt.in वर कॉन्स्टेबल / फायरमन (CISF कॉन्स्टेबल भर्ती 2022) या पदांसाठी ऑनलाइन अर्ज करण्याची प्रक्रिया आजपासून सुरु केली आहे.

CISF कॉन्स्टेबल या पदासाठी अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 4 मार्च 2022 असणार आहे. या भरती प्रक्रियेद्वारे, CISF देशभरात एकूण 1149 रिक्त पदांसाठी भरतीची प्रक्रिया सुरु आहे. या पदासाठी उमेदवार 12 वी पास असावा. तर, अर्जदाराचे वय 18 ते 23 वर्षे दरम्यान असावे अशी अट आहे.

CISF कॉन्स्टेबल पदासाठी सर्व माहिती त्यांच्या अधिकृत वेबसाईटवर 29 जानेवारी 2022 रोजी उपलब्ध होईल. शॉर्टलिस्ट केलेल्या अर्जदारांना शारीरिक कार्यक्षमता चाचणी (PET),डॉक्युमेंट्स पडताळणी (DV)तसेच लेखी चाचणीसाठी बोलावले जाईल.

महत्त्वाची माहिती

सीआयएसएफ (CISF)कॉन्स्टेबल अर्ज सुरु करण्याची तारीख - 29 जानेवारी 2022

सीआयएसएफ (CISF)कॉन्स्टेबल अर्जाची शेवटची तारीख - 04 मार्च 2022

शैक्षणिक पात्रता

या पदासाठी इच्छुक अर्जदारांना विज्ञान विषयासह 12वी उत्तीर्ण असणे गरजेचे आहे. सीआयएसएफ कॉन्स्टेबलची वयोमर्यादा 18 ते 23 वर्ष आहे. उमेदवारांची उंची 170 सेमी आणि छाती 80-85 सेमी असावी.

अर्ज कसा करायचा?

1.CISF च्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या https://cisfrectt.in.

2. मुख्यपृष्ठावरील "लॉगिन" बटणावर क्लिक करा.

3. नवीन नोंदणी बटणावर क्लिक करा.

4.आता तुमचे डिटेल्स भरा.

वेतन (21,700 रूपये -69,100 रूपये)

निवड प्रक्रिया :

अर्जदारांची निवड खाली दिलेल्या निकषांच्या आधारे केली जाईल.

शारीरिक कार्यक्षमता चाचणी (PET) आणि शारीरिक मानक चाचणी (PST)

लेखी परीक्षा

डॉक्युमेंट्स पडताळणी

मेडिकल टेस्ट

No comments:

Post a Comment

Inequality Reasoning Questions Inequality Reasoning Questions Questions 46-5...

PROMISEDPAGE

Quiz on "AZAD HIND FAUJ" UPLOADED. TYR IT.

BEST OF LUCK

"HAVE A NICE DAY "