WELCOME TO PROMISEDPAGE

Always type promisedpage4u.bogspot.com to search our blog विभिन्न "दिन विशेष" प्रश्नमंजूषा में हिस्सा लेकर बेहतरीन प्रदर्शन करने वाले सभी सहभागियों का अभिनंदन। सहभागियों की संख्या ज्यादा होने के कारण प्रमाणपत्र भेजने में देरी हो सकती है। सभी सहभागियों के प्रमाणपत्र भेजे जाएंगे। कृपया सहयोग करे। "A good teacher can inspire hope, ignite the imagination, and instil a love of learning." - Happy Teachers Day. Click here for Quiz on National Teachers Day. Participants are requested to type their correct email address to receive the certificates. Type your school name and address in short

Friday, May 7, 2021

छत्रपती शाहू महाराज: संपूर्ण माहिती

👉"सामाजिक न्याय दिनानिमित्त आयोजित प्रश्नमंजुषा" सोडवण्यासाठी येथे क्लिक करा👈

 महाराष्ट्रातील समाज सुधारक-राजर्षी शाहू महाराज (१८७४-१९२२) : राजर्षी शाहू महाराजांचा जन्म २६ जुन १८७४ रोजी कागलच्या घाटगे घराण्यात झाला. कागलचे जहागीरदार जयसिंगराव आबासाहेब घाटगे हे त्यांचे जन्मदाते वडील राधाबाई ही त्यांची जन्मदाती माता. शाहू महाराजांचे मूळ नाव यशवंतराव होते. ते दहा वर्षांचे असताना कोल्हापूरचे राजे चौथे शिवाजी यांची राणी आनंदीबाई हिने १८ मार्च १८८४ रोजी त्यांना दत्तक घेतले व ते कोल्हापूर संस्थानाचे छत्रपती शाहू महाराज झाले.

जन्म : २६ जुन १८७४

मृत्यू : ६ मे १९२२

पूर्ण नाव : छत्रपती शाहू महाराज भोसले

वडील :आबासाहेब घाटगे

आई : राधाबाई

पत्नी :  महाराणी लक्ष्मीबाई भोसले

राजर्षी शाहू महाराज बालपण आणि शिक्षण

इ. स. १८८५ मध्ये त्यांना शिक्षणासाठी राजकोट येथे पाठविण्यात आले. तेथे त्यांनी चार वर्षे शिक्षण घेतले. त्यानंतर ते कोल्हापूरला परतल्यावर धारवाड येथे शिक्षणासाठी गेले. तेथे सर एस.एम. फ्रेजर यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यकारभार, इतिहास, इंग्रजी भाषा इत्यादी विषयांचे शिक्षण घेतले. धारवाड येथे शिक्षण घेत असतानाच लक्ष्मीबाई यांच्याबरोबर एप्रिल १८९१ रोजी शाहू महाराजांचा विवाह झाला. शिक्षणक्रम संपल्यानंतर वयाच्या विसाव्या वर्षी २ एप्रिल १८९४ रोजी शाहू महाराजांनी कोल्हापूर संस्थानच्या राज्यकारभाराची सूत्रे हाती घेतली.

छत्रपती शाहू महाराज यांचे सामाजिक कार्य

बहुजन समाज सुशिक्षित झाल्याशिवाय त्यांचा उद्धार होणार नाही. त्यांच्या मागासलेपणाचे एक महत्त्वाचे कारण त्यांच्यातील शिक्षणाचा अभाव होय ही गोष्ट शाहू महाराजांनी ओळखून बहूजन समाजात शिक्षणाचा प्रसार करण्याचे ठरविले.

इ. स.१९०१ मध्ये त्यांनी मराठा विद्यार्थ्यांसाठी ‘व्हिक्टोरिया मराठा बोर्डिंग’ ची स्थापना केली. त्यांनी कोल्हापुरात निरनिराळ्या जातिधर्मांच्या विद्यार्थ्यांसाठी वसतिगृहांची स्थापना केली.

इ. स. १९०२ मध्ये राजर्षी शाहूंनी आपल्या राज्यातील सरकारी नोकऱ्यांत मागास वर्गांसाठी पन्नास टक्के जागा राखून ठेवण्याचा क्रांतिकारी निर्णय घेतला.

इ. स. १९०६ मध्ये शाहू महाराजांनी ‘शाहू छत्रपती स्पिनिंग आणि विव्हिंग मिल’ चा पाया घातला.

इ. स. १९०७ मध्ये सहकारी तत्वावर एका कापड गिरणीची त्यांनी उभारणी केली.

इ. स. १९०७ मध्येच शाहू महाराजांनी अस्पृश्य विद्यार्थ्याच्या शिक्षणाची सोय व्हावी म्हणून कोल्हापुरात ‘मिस क्लार्क बोर्डिंग’ या नावाचे वसतिगृह उघडले.

इ. स. १९०७ मध्ये कोल्हापूरच्या पश्चिमेला सुमारे ५५ कि.मी. अंतरावर दाजीपूरजवळ भोगावती नदीला बंधारा घालून जमिनीला पाणीपुरवठा करण्याची योजना त्यांनी आखली. ती इ. स. १९०८ मध्ये अमलात आणून त्या बंधान्याला ‘महाराणी लक्ष्मीबाई तलाव’ असे नाव देण्यात आले.

इ.स. १९११ मध्ये शाहू महाराजांच्या प्रेरणेने कोल्हापुरात सत्यशोधक समाजाची पुन स्थापना झाली.

१९१३ मध्ये शाहूंच्या आदेशानुसार खेड्यांमध्ये चावडी, धर्मशाळा, मंदिरे व होते. या इमारतींमधून शाळा सुरू झाल्या.

इ. स. १९१६ मध्ये बहुजन समाजाला राजकीय हक्क मिळवून देण्यासाठी त्यांनी निपाणी येथे डेक्कन रयत संस्थेची स्थापना केली.

इ. स. १९१७ मध्ये शाहूंनी प्राथमिक शाळेतील फी माफीची घोषणा केली. २१ नोव्हेंबर १९१७ रोजी काढलेल्या जाहीरनाम्यानुसार कोल्हापूर संस्थानात प्राथमिक शिक्षण सक्तीचे करण्यात आले.

इ. स.१९१७ मध्येच त्यांनी पुनर्विवाहाचा कायदा करून विधवा विवाहाला कायदेशीर मान्यता मिळून दिली.

इ. स. १९१८ मध्ये शाहूनी आपल्या संस्थानातील महार वतने रद्द केली आणि जमीन अस्पृश्यांच्या नावावर रयतवारीने करून दिल्या. अस्पृश्यांकडून वेठबिगारी पद्धतीने कामे करून घेण्यास कायद्याने बंदी घातली.

इ.स. १९१८ मध्येच शाहूंनी आपल्या संस्थानात आंतरजातीय विवाहाला मान्यता देणारा कायदा केला तसेच त्यांनी स्वतः असे काही विवाह घडवून आणले.

इ.स. १९१८ मध्येच शाहूंनी वतनदारांच्या जाचातून शेतकन्यांची मुक्तता करण्यासाठी खेड्यातील कुलकर्णी वतने रद्द केली आणि त्या जागी पगारी तलाठी नेमण्याची व्यवस्था केली.

आपल्या राज्यात अस्पृश्यता पाळली जाऊ नये म्हणून शाहू महाराजांनी जाणीवपूर्वक लक्ष दिले. अस्पृश्यांना शाळा, दवाखाने, पाणवठे, सार्वजनिक विहिरी इत्यादी ठिकाणी समानतेने वागवावे, असे आदेश त्यांनी काढले.

इ.स. १९१९ मध्ये बलुतेदार पद्धत बंद करण्याविषयीच्या कायद्याचा भंग करणाऱ्याला त्यांनी १०० रु. दंड व चार दिवसांची कारावासाची शिक्षा देणारा कायदा केला.

इ.स. १९२० मध्ये कोल्हापर संस्थानातील माणगाव येथे त्याना अस्पृश्याची परिषद भरविली.

इ. स. १९२० मध्ये त्यांनी घटस्फोटाचा कायदा केला.

इ. स. १९२० मध्ये हुबळी येथे ब्राह्मणेतर सामाजिक परिषद भरली होती. तिचे अध्यक्षस्थान शाहू महाराजांनी भूषविले होते.

२६ जुन हा शाहु महाराजांचा जन्म दिवस महाराष्ट्र शासनाने २००६ पासुन”सामाजिक न्याय दिन” म्हणून साजरा करण्याचे घोषीत केले आहे.

शाहु महारांचे सुरवातीचे शिक्षक म्हणुन श्री कृष्णाजी भिकाजी गोखले व हरिपंत गोखले यांना नेमले होते.

२० मार्च १८८६ रोजी शाहु महाराज यांचे वडील जयसिंगराव यांचा मृत्यू झाला.

०८ मे १८८८ रोजी “कोल्हापूर ते मिरज” या रेल्वे मार्गाची पायाभरणी ही शाहू महाराजांच्या हस्ते करण्यात आली.

१८९० ते १८९४ या काळात शाहु महाराजांनी “धारवाड येथील “एस.एम.फ्रेजर” यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षण घेतले. इंग्रजी भाषा, जगाचा इतिहास व राज्य कारभाराचे धडे शाहु महाराजाना एस.एम.फ्रेजर यांनी दिले.

०१ एप्रील १८९१ रोजी बडोदा येथील गुणाजी खानविलकर यांची कन्या “लक्ष्मीबाई यांच्याशी शाहू महाराज यांचा विवाह झाला.

शाहु महाराजांना राधाबाई व आऊबाई अशा दोन मुली तर राजाराम व शिवाजी अशी दोन मुले अशी एकुण ०४ आपत्ये होती. यातील राजकुमार शिवाजी यांचा १९२० साली रानडुकराच्या शिकारीच्या वेळी घोड्याहुन पडुन मृत्यु झाला होता. १८९३ मध्ये कोल्हापूर संस्थानने स्वतःचे कायदे पुस्तक तयार केले.

०२ एप्रील १८९४ रोजी शाहु महाराजांचा “राज्याभिषेक” होवुन वयाच्या २० व्या वर्षी कोल्हापूर संस्थानाची सुत्रे शाहु महाराजांनी स्विकारली व शाहु महाराजांच्या राजकीय कार्यकाळास सुरुवात झाली.

शाहु महाराजांच्या राज्याभिषेक साहेळ्या दरम्यान ब्रिटीश सरकार तफै मुंबईचा गव्हर्नर लॉर्ड हॅरिसन हा उपस्थित होता.

१८९५ मध्ये शाहु महाराजांनी कोल्हापूर येथे “शाहपूरी” ही गुळाची बाजारपेठ सुरु केली.

१८९६ साली सर्व जाती जमातींच्या विद्यार्थांसाठी शाहू महाराजांनी “राजाराम” हे वस्तीगृह सुरु केले व याच सालापासुन शाहू महाराजांच्या वस्तीगृह निर्मातीच्या कार्याला सुरुवात झाली..

१८९७ साली महारोग्यांसाठी “हिक्टोरीया लेप्रसी” या हॉस्पीटलची स्थापना शाहू महाराजांनी केली.

नोव्हेंबर १८९९ मध्ये शाहू महाराजांच्या जिवनास कलाटणी देणारे “वेदोक्त प्रकरण” घडले. शाहू महाराज पंचगंगा नदी काठी स्थानासाठी गेले असतान त्यांचे पुरोहीत नारायण भटजी हे वेदोक्त मंत्राऐवजी पुराणोक्त मंत्र म्हणत असल्याचे महाराजांचे सहकारी राजाराम शास्त्री भागवत यांनी महाराजांना लक्षात आणुन दिले. या बाबत महाराजांनी विचारणा केली असता महाराज हे क्षेत्रीय नसल्यामुळे त्यांना वेदोक्त मंत्राचा अधिकार नसल्याचे सांगतीले. येतुन खऱ्या अर्थाने ब्राम्हणेत्तर संघर्ष चळवळीस सुरुवात झाली.

पारंपरिक भिक्षुकशाहीच्या वर्चस्वाला शह देण्यासाठी त्यांनी कोल्हापुरात ब्राह्मणेतर पुरोहितांची निर्मिती करण्यासाठी ‘श्री शिवाजी वैदिक स्कूल' ची स्थापना केली आणि मराठ्यांसाठी स्वतंत्र ‘क्षात्रजगद्‌गुरू' पद निर्माण करून त्यावर सदाशिवराव पाटील या उच्चविद्याविभूषित तरुणास नेमले (१९२०).

१९०१ मध्ये शाहु महाराजंनी आप्पासाहेब राजोपाध्याय यांचे बतने जप्त केली. व नारायण भट्ट सेवकरी यांच्या कडुन वेदोक्त पद्धतीने श्रवणी केली.

वेदोक्त प्रकरणामध्ये लोकमान्य टिळक व शृंगरीचे जगद्गुरु शंकराचार्य यांनी ब्राम्हणांची बाजु घेतली शाहू महाराजांवर टिका केली.

१६ एप्रील १९०२ रोजी वेदोक्त प्रकरणासंदर्भात ब्रिटीश शासनाने नेमलेल्या वेदोक्त समितीने शाहू महाराजांच्या बाजूने निकाल देऊन शाहुंना वेदोक्त मंत्राचा अधिकार असल्याचा निकाल दिला.

राजर्षी शाहु महाराज हे “डेक्कन एज्युकेशन सोसायटी” चे पदसिद्ध अध्यक्ष होते. वेदोक्त प्रकरणानंतर शाहु महाराजांनी या अध्यक्ष पदाचा राजीनामा दिला.

१९०१ मध्ये शाहु महाराजांनी कोल्हापुर संस्थानामध्ये “गोहत्या प्रतीबंधक कायदा लागु केला.

१९०१ साली शाहू महाराजांनी “ब्हिक्टोरीया मराठा बोडीग’ ची स्थापना केली. परंतु या बोडीगमध्ये फक्त ब्राम्हण मुलेच राहु लागल्याने शाहूंनी निरनिराळ्या जातीच्या लोकांसाठी वस्तीगृहे सुरु केली. 

१८ एप्रील १९०१ रोजी जैन, लिंगायत व मुस्लिम विद्याच्यांसाठी स्वतंत्र्य वस्तीगृहे शाहु महाराजांनी स्थापन केली.

शाहूंनी आर्यसमाज व थिऑसॉफिकल सोसायटी या संस्थांनाही आश्रय दिला. वेदांवरील श्रद्धा व जातिभेदाला विरोध, या आर्यसमाजाच्या तत्त्वांमुळे त्यांनी स्वत:ला ‘आर्यसमाजी' म्हणून घोषित केले; तथापि त्याच्या ते आहारी गेले नाहीत. अर्यसमाजाच्या गुरुकुलाची स्थापना झाली. पुढे राजाराम कॉलेज आर्यसमाजाकडे चालविण्यासाठी दिले गेले.

०२ जुन १९०२ रोजी शाहू महाराज हे इंग्लंडच्या ०७ व्या एडवर्ड च्या राज्यरोहन संमारंभासाठी इंग्लंडला गेले होते. या कार्यक्रमाचे वेळी केंब्रिज विद्यापीठाने शाहु महाराजांना LLD ही पदवी बहाल केली.

१९०२ साली शाहू महाराजांनी “पाटबंधारे धोरण” घोषीत केले.

मागासलेल्या जातींत शिक्षणाबद्दल फारशी आस्था नसल्याने व त्याचे कारण शिक्षण घेऊनही सरकारी नोकरी लाभण्याची शक्यता नसल्याने शाहूंनी २६ जुलै १९०२ रोजी कोल्हापूर संस्थानातील ५०% शासकीय नोकऱ्या मागासलेल्या वर्गासाठी राखीव ठेवल्याचा जाहीरनामा काढला. राखीव जागांचे धोरण अमलात आणणारे शाहू हे हिंदुस्थानातील पहिले राज्यकर्ते ठरले

२६ जुलै १९०२ रोजी शाहू महाराजांनी कोल्हापुर संस्थानातील मागासवगीय लोकांसाठी ५० टक्के जागा राखीव / आरक्षीत ठेवल्या. आरक्षण बाबतचा हा जाहीरनामा ‘करवीर गैजेट” मधुन प्रकाशित करण्यात आला होता.

१९०५ साली शाहू महाराजांनी राजोपाध्याय यांची इनामें जप्त केली व छात्र जगतगुरुचे नवे पीठ निर्माण करुन मराठा जातीच्या “सदाशिव बेनाडीकर” यांची पीठाचे प्रमुख म्हणून नेमणुक करण्यात आली.

तसेच संस्थान मध्ये निरनिराळ्या जातीचे पुरोहीत निर्माण करण्याकरीता “पुरोहीत शाळा” निर्माण केल्या.

१९०६ मध्ये शाहु महाराजांनी “छत्रपती शाहू स्पिनींग व जिनींग मिल” स्थापन केली. (२००३ मध्ये महाराष्ट्र शासनाने ही मिल बंद केली आहे) 

१९०६ साली शाहु महाराजांनी कोल्हापूर संस्थानात “रात्रशाळा” सुरु केल्या. तर १९०७ साली शाहु महाराजांनी मुलींसाठी रात्रशाळा सुरु केल्या.

१९०७ साली कोल्हापुरच्या पश्चिमेस ५५ किमी अंतरावर दाजीपुर जवळ भोगावती नदीवर धरण बांधुन त्याच्या जलाशयास महाराणी लक्ष्मीबाई” हे नाव देण्यात आले. या धरणाचे काम सबनीस या इंजिनीअर कडुन करुन घेण्यात आले. याच धरणाशेजारी शाहू महाराजांच्या मुलीच्या नावावर “राधानगरी” हे गाव बसविण्यात आले.

१९०८ साली शाहु महाराजांनी अस्पृश्यांसाठी “मिस क्लार्क” हे वस्तीगृह स्थापन केले.

२० मे १९११ रोजी शाहु महाराजांनी संस्थानामार्फत विद्याथ्यांना १५ टक्के शिष्यवृत्तीची घोषणा केली.

१९११ साली शाहु महाराजानी शिंपी समाजाच्या मुलांसाठी “नामदेव वस्तीगृह” सुरु केले.

शाहूंनी ‘सहकारी संस्थांचा कायदा' करून सहकारी चळवळीची मुहूर्तमेढ रोवली (१९१३).

खेड्यापाड्यांतील बलुतेदारांनाही त्यांच्या बलुतेपद्धतीतून मुक्त करून त्यांना समाजातील सर्व उद्योगधंदे खुले केले (१९१८). 

शाहूंची डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याशी भेट झाली (१९१९). बाबासाहेबांच्या मूकनायक या वृत्तपत्रास व पुढे त्यांच्या इंग्लंडमधील उच्चशिक्षणास त्यांनी अर्थसाहाय्य केले. माणगाव व नागपूर येथील अस्पृश्यता निवारण परिषदांत बाबासाहेबांबरोबर सहभागी होऊन अस्पृश्यांना त्यांचा ‘खरा पुढारी' मिळाल्याबद्दल त्यांनी त्यांचा गौरव केला.

कुटुंबात होणाऱ्या शारीरिक व मानसिक छळांपासून स्त्रीला संरक्षण देणारा कायदाही त्यांनी मंजूर केला (१९१९).

जोगिणी व देवदासी प्रथेस प्रतिबंध करणार कायदा जारी केला (१९२०).

रोमच्या आखाड्याच्या धर्तीवर कोल्हापुरात कुस्तीचे मैदान बांधले. त्यांच्या कारकीर्दीत कोल्हापूर ही ‘मल्लविद्येची पंढरी' बनली. 

नाट्यकलेच्या जोपासनेसाठी त्यांनी कोल्हापुरात भव्य पॅलेस थिएटर (केशवराव भोसले नाट्यगृह) बांधले.

मुंबई येथे त्यांचे वयाच्या अवघ्या अठ्ठेचाळीसाव्या वर्षी हृदयविकाराने निधन झाले. त्यांच्यानंतर त्यांचे पुत्र राजाराम महाराज कोल्हापूरच्या गादीवर आले.

छत्रपती शाहू महाराज विशेषता

राजर्षी शाहू महाराजांना महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी ‘सर्वांगपूर्ण राष्ट्रपुरुष’ अशा शब्दांत यथार्थपणे गौरविलेले आहे.

शाहूंच्या सामाजिक कार्याचा गौरव म्हणून कानपूर येथे कुर्मी क्षत्रिय सभेने त्यांना ‘राजर्षी' पदवी बहाल केली (१९१९). 

👉"सामाजिक न्याय दिनानिमित्त आयोजित प्रश्नमंजुषा" सोडवण्यासाठी येथे क्लिक करा👈

No comments:

Post a Comment

Consumer Rights Class 10 MCQs Questions with Answers

Choose the correct option: Question 1. Which one of the following days is being observed as ‘National Consumers Day’ in India? (a) 24 De...

PROMISEDPAGE

Quiz on "AZAD HIND FAUJ" UPLOADED. TYR IT.

BEST OF LUCK

"HAVE A NICE DAY "