Sunday, December 20, 2020

 मोहनदास करमचंद गांधी

मोहनदास करमचंद गांधी  भारताच्या स्वातंत्र्य संग्रामातील प्रमुख नेते आणि तत्त्वज्ञ होते. महात्मा गांधी या नावाने ते ओळखले जातात. अहिंसात्मक असहकार आंदोलनांनी गांधीजीनी भारताला स्वातंत्र्य मिळवून दिले. अहिंसात्मक मार्गांनी स्वातंत्र्य मिळवण्यासाठी त्यानी संपूर्ण जगाला प्रेरित केले. रवींद्रनाथ टागोर यांनी सर्वप्रथम त्यांना महात्मा ही उपाधी दिली. भारतातील लोक त्यांना प्रेमाने बापू म्हणत आणि त्यांना स्वतंत्र भारताचे राष्ट्रपिता मानले जाते. सुभाषचंद्र बोस यांनी इ.स. १९४४ मध्ये त्यांना प्रथम राष्ट्रपिता असे संबोधले, असे म्हणतात. गांधी सविनय सत्याग्रहाच्या कल्पनेचे जनक होते. त्यांची जयंती भारतात गांधी जयंती म्हणून तर जगभरात आंतरराष्ट्रीय अहिंसा दिन म्हणून साजरी केली जाते

        असहकार आणि अहिंसेच्या तत्त्वावर आधारित सत्याग्रहाचा उपयोग गांधीजींनी प्रथम दक्षिण आफ्रिकेमध्ये, तेथील भारतीयांना त्यांचे नागरी हक्क मिळवून देण्यासाठी केला. १९१५ मध्ये भारतात परत आल्यावर त्यांनी चंपारणमधील शेतकर्‍यांना जुलुमी कर व जमीनदार यांच्याविरुद्ध लढण्यासाठी एकत्र केले. १९२१ मध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची सूत्रे सांभाळल्यानंतर गरिबी निर्मूलन, आर्थिक स्वावलंबन, स्त्रियांचे समान हक्क, सर्व-धर्म-समभाव, अस्पृश्यता निवारण आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे स्वराज्य यासाठी देशभरात चळवळ चालू केली. गांधीजी आजीवन साम्प्रदायीकातावादा (सम्प्रदायांवर राजकारण करणे) चे विरोधक होते आणि ते मोठ्या प्रमाणात सर्व धर्म आणि पंथ यांच्यापर्यंत पोहोचले. ढासळत जाणार्‍या खिलाफत चळवळीला त्यानी आधार दिला आणि ते मुस्लिमांचे नेते बनले.१९३० मध्ये इंग्रजांनी लादलेल्या मिठावरील कराविरोधात त्यांनी हजारो भारतीयांचे ४०० कि.मी. (२५० मैल) लांब दांडी यात्रेमध्ये प्रतिनिधित्व केले. १९४२ मध्ये त्यांनी इंग्रजांविरुद्ध भारत छोडो आंदोलन चालू केले. या आणि यासारख्या इतर कारणांसाठी त्यांना भारतात तसेच दक्षिण आफ्रिकेमध्ये अनेकदा तुरुंगात टाकण्यात आले.

गांधी आणि आंबेडकर

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना गांधीजींची अस्पृश्योद्धाराची भुमिका नेहमीच दांभिक वाटत होती. स्वत: गांधीजींची अस्प्रूश्योद्धाराची तळमळ प्रामाणिक होती, असे मी मानतो. गांधीजी स्वत: वैयक्तिक अस्पृश्यता पाळत नसत, अस्पृश्यता न पाळणारे व अस्पृश्योद्धाराचे काम करणारे शेकडो स्पृश्य कार्यकर्ते गांधीजींच्या चळवळीमुळे निर्माण झाले, हे उघड सत्य आहे

गांधीजींची खरी अडचण वेगळी होती. गांधीजी हे नुसते हिंदू धर्माचे अभिमानी नव्हते तर वर्णाश्रमाचे पुरस्कर्तेही होते! पण त्यांच्या धर्मकल्पनेत रुढी आणि चालीरितींना जागा नव्हती. ते परंपरागत जीवनाचे अभिमानी होते, पण त्यांना स्त्रीशिक्षण आवश्यक वाटे. प्रौढविवाह, प्रेमविवाह, हिंदू धर्मातल्या धर्मात आंतरजातीय विवाह या सा-यांनाच गांधीजींचा सक्रीय पाठींबा होता. अस्पृश्यांविषयीची त्यांची तळमळ प्रामाणिक होती, तो त्यांचा नित्य कार्यक्रम होता. अस्पृश्यांचा प्रश्न गांधीजी हिंदू समाजांतर्गत प्रश्न म्हणून सोडवु इच्छित होते. ज्यामुळे हिंदू धर्म, संस्कृती, परंपरा यांच्याविषयी अस्पृश्य समाजाच्या मनात तिरस्कार व तिटकारा निर्माण होईल असे काही करण्यास गांधीजी तयार नव्हते. परंपरावादी हिंदूंचे परंपरावादी मन न दुखावता परंपरेच्या भाषेत बोलुन गांधीजी परंपरेच्या चालीरिती बदलु इच्छित होते. ह्यातील तथ्य इतकेच की, गांधी प्रामुख्याने सुधारणावादी होते.

गांधीजींचा कार्यक्रम अस्पृश्यांच्या प्रश्नाकडे लक्ष वेधणारा, अस्पृश्यांमध्ये काही सुधारणा घडवुन आणणारा सुद्धा असेल .. मात्र हा कार्यक्रम दलितांमध्ये नवा आत्मविश्वास, जिद्द आणि जागृती निर्माण करणारा, त्यांची अस्मिता पेटवणारा कार्यक्रम असु शकत नव्हता. गांधीजी अस्पृश्यतेवर बोलत तरी होते, नेहरु-पटेल यांच्यासारख्या कॉंग्रेसी सवर्ण नेत्यांना अस्प्रुश्यांचा प्रश्न नित्य चर्चेचा कधी वाटलाच नाही. सगळीकडेच मुलभुत सामाजिक परिवर्तन घडवायचे आहे, न्याय व समतेवर आधारलेले नवे जीवन उभारायचे आहे.. त्यात अस्पृश्यतेसारखे प्रश्न आपोआपच संपून जातील असंच या नेत्यांना वाटत आलं. गांधीजींच्या प्रामाणिक अनुयायांची अशी संख्या किती होती ? फार थोडी ! उरलेली सगळी कॉंग्रेस ही वरिष्ठवर्णीय, सामाजिक दृष्ट्या सनातनी आणि आर्थिक दृष्ट्या स्थितीवादी अशीच होती.

गांधीजींचा आर्थिक कार्यक्रम(ग्रामस्वावलंबनावर आधारित) आंबेडकरांना मान्य नव्हता. ग्रामीण जीवनाला प्राधान्य देणारी ग्रामप्रधान अर्थरचना परंपरागत जीवन आणि परंपरागत अस्पृश्यता टिकवुन धरील असे आंबेडकरांना वाटे. वरिष्ठ वर्णीयांच्या नेतृत्वाखाली असणा-या संघटना अस्पृश्यांना प्रतिष्ठा आणि न्याय मिळवुन देतील असं आंबेडकरांना वाटण्याचा संभवच नव्हता. म्हणुन त्यांचे गांधीजींशी फारसे जुळले नाही

No comments:

Post a Comment

MCQ Quiz: Citizen's Charter of Navodaya Vidyalaya Samiti MCQ Quiz: Citizen's Charter of N...

PROMISEDPAGE

Quiz on "AZAD HIND FAUJ" UPLOADED. TYR IT.

BEST OF LUCK

"HAVE A NICE DAY "